चार जणांना अटक, साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : ऑस्ट्रीलीया येथे क्रिडा स्पर्धा सुरू असून, त्यावर लाखो रुपयाचा सट्टा लावल्या जातो. शहरातील आठवडी बाजारात सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर सायबर सेलच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत चार जणांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून हॉटलाईन, पोपट लाईन डब्बा व अन्य ६ लाख ५७ हजाराचे साहित्य जप्त केले.
नितिन उर्फ राम चिमणलाल शर्मा (३२) रा. आठवडी बाजार, निलेश अर्जुन नान्हे (२६) रा. आठवउी बाजार, दुर्गेशसिंग मोतीसिंग राणा (२४) रा. आठवडी बाजार, विक्रम विजय गहरवाल (३२) रा. साईमं दिर जवळ यवतमाळ अशी अटक केलेल्या सट्टा घेणा-यांची नावे आहे. २८ डिसेंबर रोजी थेट क्रिकेट मॅचचे प्रेक्षपण बिग बैश लिग टि २० -अॅडेलाईट विरुद्ध पार्थ हा सामना चालु होता. या सामन्यावर बेटींग, सट्टा सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांना मिळाली होती. त्यावरून सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी आगासे यांच्या नेतृत्वातील पथकाने आठवडी बाजारातील नितीन शर्मा याच्या घरी धाड टाकली. यावेळी नितिन शर्मा, निलेश नान्हे, दुर्गेशसिंग राणा, विक्रमक गहरवाल हे सामन्याचे एलईडी टीव्हीवर थेट प्रेक्षपण सुरू असतांना हॉट लाईन व मोबाईल फोन द्वारे क्रिकेट सट्ट्यावर आकडे घेतांना व लॅपटॉप, कागदावर नोंदी करतांना मिळाले. पोलिसांनी चारही आरोपीच्या ताब्यातून क्रिकेट बेटींग, सट्टा खेळविण्यासाठी लागणारे साहित्य एक हॉट लाईन, १६ मोबाईल कनेक्शन असलेला पोपटलाईन डब्बा, एक लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी टीव्ही, २५ मोबाईल, एक मोटार सायकल व इतर साहित्य, रोख रक्कम ३ लाख १८ हजार ८६० रुपये असा एकुण ६ लाख ५७ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षकडॉ. दिलीप भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ.के. ए. धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, पोहवा गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, कविश पाळेकर, किशोर झेंडेकर, पंकज गिरी, अजय निंबाळकर, सतिश सोनोने, सिमा बोबाडे, प्रमिला डेरे, सुनिता देवगडकर, मिलती तरोणे, निशा शेंडे यांनी केली.
—-चौकट —-
पथकाला २५ हजाराचे बक्षीस
यवतमाळ शहर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टाचे केंद्र असल्याचे संबोधले जाते. क्रिकेट सट्ट्यावर दररोज कोट्यावधीची उलाढाल होते. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी शहरातील अवैध व्यावसायीकांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान सायबर सेलच्या पथकाने येथील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याचा पर्दाफाश केला. या पथकाचे प्रमुख अमोल पुरी यांना २५ हजाराचे रोख बक्षीस जाहिर केले आहे.