महागाव : तालुक्यातील वडद रोडवर असलेल्या तीन घरांना आग लागल्याची घटना सोमवारच्या रात्री ९ साडे नऊ च्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार , मुडाणा येथील सुधाकर पाईकराव यांच्या शेतात तीन घरे आहेत.रात्री साडे नऊच्या सुमारास अचानक आग लागली असल्याची माहिती नागरिकांना मिळताच नागरिकांनी धाव घेतली.मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने तिन्ही घरे आगीत भस्म झालेत.
एका घरात शेळ्या, कोंबड्या, व बकऱ्या असे पाळीव प्राणी होतें.नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली.मात्र या आगीच्या तडाख्यात पाळीव प्राणी सापडल्याने तीन ते चार जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रथमदर्शनी दिली.