पांढरकवडा : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन यवतमाळ र.नं. 380 पांढरकवडा तहसील द्वारा गटशिक्षण अधिकारी पांढरकवडा यांना निवेदन सादर देण्यात आले.
पांढरकवडा शहरातील खाजगी शिक्षण मागील नऊ महिन्यांपासून बंद आहे. खाजगी शिक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

खाजगी शिकवणी सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. पांढरकवडा शहरातील सरकारी व अनुदानित शाळेतील शिक्षक खाजगी शिकवणी घेत आहेत. यावर प्रतिबंध व कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. गटशिक्षण अधिकारी संघटनेला पूर्ण सहकार्य देण्याचे व दुहेरी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतांना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन जिल्हा यवतमाळ र. नं. 380 पांढरकवड्याचे तालुकाध्यक्ष सागर लहामगे, मुख्य सल्लागार राजेश सोनुले , उपाध्यक्ष अमृत वानखेडे, सचिव धीरज येलचलवार, सहसचिव सचिन शिरपूरकर, कोषाध्यक्ष रितेश मुप्पीडवार, प्रसिद्धीप्रमुख सतीश राऊत, सदस्य सुनील केरवतकर, वैभव गुरनुले उपस्थित होते.