दारव्हा : तालुक्यातील अनेक गावच्या शेतकऱ्यांना शेतमाल शेतातुन घरी किंवा बाजारात नेण्यास रस्ता नसल्यामुळे अनेक यातनांना सामोरे जावे लागते.शासनाने मग्रारोहयो अंतर्गत शेत रस्ते पांदनरस्ते जोडण्यासंदर्भात शासकीय परीपत्रक काढुन कार्यान्वयीन यंत्रणांना पांदनरस्ते बांधकामांचे निर्देश दिले.
परंतु कार्यान्वीत यंत्रणांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे तालुक्यातील अनेक पांदन रस्ते पुर्ण झाल्याचे दर्शवुन अर्धवट बांधकाम केलेल्या रस्त्याचे पुर्णत्वाचे दाखले सादर करण्यात आलेले आहे. सदर पांदणरस्त्यावर लाखो रुपये खर्चही दर्शविण्यात आलेला आहे.परंतु रस्त्याची उपयोगीता नाही. सध्या शेतकऱ्यांना कापुस सोयाबीन घरापर्यंत आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अर्धवट बांधलेले पांदन रस्ते पुर्ण करण्यात यावे तसेच पांदणरस्त्यावरील झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.