पांढरकवडा दि.१८/१०/२०२१
आज पांढरकवडा बस स्थानक येथे नगर परिषद पांढरकवडा, बस आगार व्यवस्थापक, तहसील कार्यालय पांढरकवडा, विधी सेवा समिती,तथा वकील संघ आणि सर्व शासकीय कार्यालयांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे कायदे विषयक जनजागृती करण्यात आले. त्यानंतर माणुसकीच्या भिंतींचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून गरजु व गरीब लोकांना जुने कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बुद्रुक साहेब (न्यायाधीश दिवाणी न्यायालय केळापूर) , प्रमुख उपस्थिती श्री सुरेश कव्हळे (तहसीलदार केळापूर) श्री. अनंत ताकर आगार व्यवस्थापक पांढरकवडा,नगर परिषद मुख्याधिकारी श्री राजू मोट्टेमवार , अधिक्षक विनोद अंबाडकर , आरोग्य निरीक्षक संतोष व्यास , विधी सेवा समिती तर्फे श्री ॲड गजानन खैरकार, ॲड बिजेवार ,ॲड पेटेवार आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी कायदे विषयक माहिती दिली तर तहसील दार साहेब यांनी विविध शासकीय योजना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पेटेवार यांनी केले तर आभार कनाके यांनी केले.