यवतमाळ : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र मागितले आहेत. नवीन उमेदवार सर्व दाखले ग्रामसेवकांनीच द्यावे अशी सक्ती करीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत आरटिएस.2018/प्र.क्र.145/आस्था -5/दिनांक 13 फेब्रुवारी 2019 च्या निर्णयाद्वारे ग्रामपंचायतीकडून फक्त 7 प्रकारचे दाखले दिल्या जातील अशा प्रकारची अधिसूचना काढण्यात आलेली होती. निवडणुकीकरिता आवश्यक असणारे सर्व दाखले इच्छुक उमेदवारांनी घोषणापत्र द्वारे सादर करायची आहेत. सर्व घोषणापत्र शासनाने अधिकृतरीत्या जाहीर केल्यामुळे निवडणूक विभागाने सुद्धा स्विकारावे .कुठलाही दाखला लागल्यास ग्रामसेवकावर सक्ती केली जाते.

कोट
1) शासनाने अधिकृत केलेल्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त इतर दाखले देण्याचा अधिकार ग्रामसेवकांना नाही.
मराग्रासेसंघ. अध्यक्ष यवतमाळ
राजेंद्र महल्ले
2) ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याबाबत दाखला फक्त ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडून घ्यावा उर्वरित सर्व दाखले स्वयंघोषणापत्र उमेदवारांनी सादर करावे .
लक्ष्मण नागरगोजे सरचिटणीस
3) निवडणुकीकरिता लागणारे प्रमाणपत्राची ग्रामासेवकांना सक्ती करू नये.याबाबतचे निवेदन यवतमाळ निवडणूक विभागाला सादर केले असून त्यांनी मान्य सुध्दा केले.
राजेंद्र खरतडे, ईकबाल साखळे
ग्रामसेवक संघ सचिव