Saturday, July 27, 2024
Homeयवतमाळदिनदर्शिकेच्या माध्यमातुन कोरोना योद्यांचा सन्मान

दिनदर्शिकेच्या माध्यमातुन कोरोना योद्यांचा सन्मान

स्वाभिमान कामगार संघटनेचे निरज वाघमारे यांचा स्तुत्य उपक्रम

विदर्भ कल्याण न्युज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना काळात जीवाची बाजी लावुन कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कोरोना योद्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांच्या कार्याचा दिनदर्शिकेच्या माध्यमातुन गौरव करण्याचा अभिनव व स्तुत्य उपक्रम स्वाभिमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निरज वाघमारे यांनी राबविला. या अभिनव दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.


जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य विषाणू रोगाने जगभरात थैमान घातल्याने सर्वांनी आप आपल्या परीने या पासुन वाचण्यासाठी प्रयत्न केले परंतु या जीवघेण्या आजारात सुद्धा आपली व आपल्या परिवाराच्या जीवाची तमा न बाळगता जनतेच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालुन कार्य करणाऱ्या प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी व स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याच्या भावनेतुन स्वाभिमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निरज वाघमारे यांनी नववर्षाच्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक जिल्हा महसुल प्रशासन, जि.प.प्रशासन,आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन,महावितरण, जि.प.आरोग्य विभाग, नगर परिषद प्रशासन,जिल्हा पशुधन विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,१०८रुग्णवाहिका, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा गौरव करण्यात येवुन त्यांच्या कार्याला सलाम केला. या अभिनव दिनदर्शिकेचे यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंह यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे व पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या कल्पकतेतुन कोरोना योद्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सलाम करण्याचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल निरज वाघमारे यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.


प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव म्हणुन त्यांना दिनदर्शिकेवर स्थान देण्याची ही पहिलीच वेळ असुन सुंदर शब्दांकन,उत्कृष्ट छायाचित्र, जबरदस्त मांडणी अशी अतिशय सुंदर मांडणी हे या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य असुन या दिनदर्शिकेचे संपादन करणारे निरज वाघमारे यांचे कार्य कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.
:-एम.देवेंद्रसिंह(जिल्हाधिकारी यवतमाळ)

दिनदर्शिका पाहून सफाई कामगार भावुककोरोना काळात व एरवी सुद्धा आम्ही कुठचा ही संकोच न बाळगता स्वच्छतेची सदोदित कामे करत असतो. परंतु सर्व जण आमच्या या घटकांकडे नेहमी दुर्लक्ष होते परंतु नीरज भाऊ यांनी यावर्षी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेत आम्हाला स्थान देऊन सर्व विभागाबरोबर आमचा ही गौरव केल्याने हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.

अविनाश बिसमोरे
सफाई कामगार ( कोविड सेंटर)

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular