दारव्हा : तेली समाजाचे आराध्यदैवत स्फुर्तिस्थान संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबर ला जयंती देशभरात समस्त तेली बांधव तसेच वारकरी श्रद्धेने साजरी करतात. परंतु कालनिर्णय ह्या दिनदर्शिकेत जयंतीचा उल्लेख टाळण्यात आला.

त्यामुळे स्थानिक तेली समाज बांधवांनी तहसीलदार दारव्हा यांना निवेदन दिले. कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली. यावेळी नंदकिशोर जिरापुरे, रुपेश गुल्हाने प्रकाश गुल्हाने, गजानन गुल्हाने, धंनजय बलखंडे,रोणित गुल्हाने संदिप शिले, गौरव जावरे,सतीष गुल्हाने,अमीत गुल्हाने हर्षल बलंखडे उपस्थित होते.