यवतमाळ : डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे सहकार भवन यवतमाळ येथे भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण महर्षी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी(प्राथ.) प्रमोद सुर्यवंशी , उपशिक्षणाधिकारी राजु मडावी, श्री वसंत नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पी.सी.राठोड, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी खोपे, प्रदेश महासचिव (मा.) सतीश काळे, विभागीय अध्यक्ष (अमरावती विभाग), ज्ञानेश्वर गायकवाड. बाळासाहेब गावंडे उपस्थित होते. माध्यमिक विभागात यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी मुख्याध्यापक नितीन ठाकरे तर सचिवपदी प्रशांत जिंनेवार, उपाध्यक्ष तुळशीराम जाधव,नरेंद्र जाधव, संघटक राहुल कोचे, समन्वयक राजेन्द्र फुन्ने, कोषाध्यक्ष देवदत्त भोयर,सहकोषाध्यक्ष नितीन महल्ले , प्रसिद्धी प्रमुख प्रवीण देवतळे यांची निवड करण्यात आली. तसेच प्राथमिक जिल्हाध्यक्ष पदी सुनील मनवर तर सचिव पदी दत्तात्रय गावंडे, उपाध्यक्ष सादिक पठाण, विनय माने, कार्याध्यक्ष आशिष खडसे, कोषाध्यक्ष नरेंद्र हाडके, सहसचिव महादेव ढगे, संघटक राजु उरकुडे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र गुघाने, यवतमाळ तालुका प्रमुख विजय ढाले, सचिव चंदू खोडके, महिला प्रमुख सुजाता इंगोले, दारव्हा तालुका अध्यक्ष प्रियंका तेलगोटे, माध्यमिक पुसद तालुका प्रमुख चंद्रकांत ठेंगे, माध्य.दिग्रस अमोल जाधव, माध्य. दारव्हा-छगन जाधव, माध्य.महागाव- अंबादास राठोड, माध्य. उमरखेड- प्रवीण सुर्यवंशी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश काळे यांनी और संचालन प्रवीण भोयर यांनी केले. आभार प्रदर्शन विनोद डाखोरे सरांनी केले.