घाटंजी : शिक्षण, शेती व शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ यांना वाहून घेतलेले देशाचे पहिले कृषीमंत्री, थोर स्वातंत्र्यसेनानी, विचारवंत, अमरावती जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करणारे शिक्षण प्रसारक, डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती स्थानिक जयभिम चौकात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील नगराळे होते. यावेळी शंकर लेनगुरे, अजय गजभिये, संतोष ओंकार, संजय घुसे, दुधनाथ गजभिये, रवी बिसमोरे, सागर बिसमोरे, शाहरुख पठाण, सादिक पठाण, डॉ.रिजवान, शेख फराण, सय्यद आसिफ, शुभम नगराळे, सुनील माने, गिरीधर ठाकरे, जितू राठोड, सूर्यकांत ढोके, शरद सोयाम, प्रवीण मेश्राम, गणेश लोहकरे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या प्रसंगी बी. टी. वाढवे यांनी आपल्या मनोगतातून डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंम्बर 1898 रोजी पापळ जिल्हा अमरावती येथे झाला. देश स्वातंत्र्यानंतर ते प्रथम केंद्रीय कृषी मंत्री होते. त्यांनी दिन दलित, शेतकरी, शेत मजूर यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी व शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणुन श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहेेअसे मत व्यक्त केले. तर डॉ.पंजाबराव देशमुख हे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले, त्यांनी गावोगावी जाऊन लोक वर्गणी गोळा करून श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून गोर गरिबांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिले.अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद, रूढी-परंपरा हे मिटविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतल्याचे मत सुनील नगराळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र मुनेश्वर तर आभार प्रदर्शन उमेश घरडे यांनी मानले.