सहा महिन्यापासून वयाचे दाखले देणे केले बंद
आधार कार्डच वयाचा पुरावा ग्राह्य धरावा
यवतमाळ : निराधार वृद्ध व्यक्तींना निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी वयाचा पुरावा बंधनकारक आहे. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकाकडून निराधाराना वयाचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे निराधाराची हेळसांड होत असून, आधार कार्डच वयाचा पुरावा ग्राह्य धरावा अशी मागणी गुरुदेव युवा संघाने केली आहे.
सध्यस्थित जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून वयाचा पुरावा देणे बंद केले आहे. मागील सहा महिन्यापासून अनेक निराधार वृद्ध निराधार योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. कोरोना विषाणूचे कारण पुढे करीत येथील जिल्हा शल्य चिकित्सक निराधार वृद्धाची हेळसांड करीत आहेत. यापूर्वीही त्यांची आर्थिक लूट केल्या जात होती. अशा जिल्हा शल्य चिकित्सकावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. गोरगरीब निराधार व्यक्तींना आधार कार्डच पुरावा धरून तलाठीकडूनच वयाचा दाखल देण्यात यावा अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.