Tuesday, October 15, 2024
Homeयवतमाळजिल्हा परिषद कृषी विभागाच्या शेतीवर अनाधिकृत ताबा

जिल्हा परिषद कृषी विभागाच्या शेतीवर अनाधिकृत ताबा

भाजपा पदाधिका-यांच्या भावावर गुन्हा दाखल

उमरखेड : राजकिय शक्तीच्या जोरावर यवतमाळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मालकी व ताबा असलेल्या चुरमुरा फाटयाजवळील उमरखेड खंड -१ मधील ६ हेक्टर ३९ आर शेतजमिनीचा अनाधिकृत ताबा घेतला होता. त्यातील वृक्षतोड करुन पिकांची लागवड केल्याप्रकरणी उमरखेड पं .स.चे कृषी अधिकारी अतुल कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्जियावरुन भाजपा पदाधिका-याचा भाऊ विजय भूतडा व रामराव नरवाडे यांचे विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे .


पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार , यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मालकी व ताबा असलेल्या यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मालकीची स .नं ४३ / १ क्षेत्र .१ .५६ हे .आर . व स .नं .४२ मधील सातबारावर मालक म्हणून उललेख असलेले सखाराम गोविंद देव यांचे नावाचा आहे. मात्र सातबारावर उल्लेख नसतांना ताबा जि .प . सिईओंचा आहे. उमरखेड खंड-१ मधील सव्हे नं .४२ व ४३ / १ मधील एकुण क्षेत्र ६.३९ मध्ये अनाधिकृत वृक्षतोड करून या शेतात ऊस, हरबरा या पिकांची लागवड अनाधिकृतपणे केली. तसेच सदर जमिनीमध्ये अवैधरित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि .प . मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

संबंधितांविरूद्ध कार्यवाहीची मागणी केली होती . त्यानुसार तार कुंपन करण्याच्या हेतूने तेथे जि .प . च्या वतीने मालकी व ताब्यासंदर्भात जाहिर सुचनेचे फलक लावले होते. सदर फलक दुसरीकडे फेकून देवुन अनाधिकृत ताबा घेतला. भाजपा पदाधिका-याचा भाऊ विजय भूतडा व बिटरगाव ( खु ) येथील रामराव नरवाडे यांनी ऊस व हरबरा पिकाची लागवड केली . संबंधितांविरूद्ध पं .स . चे कृषी अधिकारी अतुल कदम यांनी उमरखेड पो . स्टे .ला तक्रार दिली. पोलीसांनी भादंवि ४४७ , ४२७ व ( ३४ ) नुसार गुन्हा दाखल केला आहे .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular