घाटंजी : पेरियार इ. व्ही.रामास्वामी यांचा स्मृती दिवसानिमित्य स्थानिक जयभिम चौकात काल अभिवादन सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सुनील नगराळे तर प्रमुख अतिथी म्हणून बि. टी. वाढवे, शंकर लेनगुरे,(तालुका अध्यक्ष माळी महासंघ) यांची प्रमुख उपस्थिती होती. पेरियार इ. व्ही.रामास्वामी यांनी समाजातील अंधश्रद्धा,रूढी,परंपरा याचा कायम विरोध करून सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी कार्य केले असल्याचे मनोगत सुनील नगराळे यांनी व्यक्त केले.
तर पेरियार हे एक भारतीय तत्त्ववेत्ता, राजकारणी, स्वातंत्र्य आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी स्वाभिमान-चळवळ सुरू केली आणि दक्षिण भारतातील राज्यांचा समावेश करून द्रविड नाडू या स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रस्ताव दिला. या महामानवाचा मृत्यू 24 डिसेम्बर 1973 रोजी तामिळनाडू येथे झाल्याचे मत प्रमुख अतिथी बी.टी. वाढवे यांनी व्यक्त केले. प्रसंगी अजय गजभिये,अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, महासचिव संतोष ओंकार, संजय घुसे, दुधनाथ गजभिये, शाहरुख पठाण, सादिक पठाण, डॉ.रिजवान, शेख फराण, सय्यद आसिफ, शुभम नगराळे, सुनील माने, गिरीधर ठाकरे, जितू राठोड, सूर्यकांत ढोके, शरद सोयाम, प्रवीण मेश्राम या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संचालन जितेंद्र मुनेश्वर यांनी तर आभार उमेश घरडे यांनी मानले.