पुसद : येथे अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद च्या पुसदच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. पुसद येथील बस स्टँड परिसरात गोर, गरीब गरजू आबाल वृद्ध नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष शेख कय्युम, तालुकाध्यक्ष मनीष दशरथकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, तालुका कार्याध्यक्ष राजेश ढोले, सचिव कैलास श्रावणे, ज्येष्ठ उपाध्यक्ष राऊत, शहर अध्यक्ष दिनेश खांडेकर उपस्थित होते.