दारव्हा : तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या नामांकनास सुरुवात झाली आहे. ईच्छुकांची समर्थकांसह तहसील कार्यालयात गर्दी पहायला मिळते आहे. १५ व्या वित्त आयोगानुसार ग्राम पंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. त्यामुळे पदाधिकारी होऊ ईच्छीणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्राम पंचायत निवडणुकांचे मतदान १५ जानेवारी ला होणार असुन मतमोजणी १८ जानेवारी ला होणार आहे.
ज्या ग्रामपंचायती निवडणुका विनाविरोध करतील अशा ग्रामपंचायतींना विशेष विकास आराखडा मंजूर करण्यात येईल. त्यामुळे अधिकाधिक ग्रामपंचायतींनी विनाविरोध सदस्य निवडून द्यावेत असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री ना.संजय राठोड यांनी केले आहे. सुज्ञ गावकरी निवडणुका विनाविरोध करण्यासाठी एकमेकांची मनधरणी करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.तसेच एका गावात अनेक ईच्छूक असल्याचे देखील दिसत आहेत.