शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांचे शिवसैनिकांना आवाहन
यवतमाळ : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोरोना संकटात सुध्दा विकासाची कामे सुरु आहे. या कामाच्या आधारावरच नागरीकांपर्यन्त पोहचा आणि जिल्हा ग्रामपंचायत निवडणूकीत भगवामय करा, असे आवाहन शिवसेना नेते राज्याचे वनमंत्री संजयभाऊ राठोड यांनी शिवसैनिकांना केले. ते यवतमाळ येथे टिळक स्मारक मंदीरात आयोजित शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीत बोलत होते.
राज्यात लवकरच ग्रामपंचायत च्या निवडणूका होऊ घातल्या आहे. यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांना विदर्भातील नागपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती व मराठवाडा येथील नांदेड या पाच जिल्हयांची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी दिली आहे. त्याअनुषंगाने विदर्भातील तीन व मराठवाड्यातील नांदेड जिल्हाचा आढावा घेतल्यानंतर आज यवतमाळ जिल्हयाचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत संजयभाऊ राठोड यांनी जिल्हयात सर्वाधिक ग्रामपंचायत वर भगवा फडकविण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. गरामपंचतल्यात निवडणुकीनंतर शहरासारखाच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी डीपीआर तयार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायाती पर्यंत निधी नेण्यासाठी विशेष लक्ष केन्द्रीत केले जाईल.शिवसैनिकांनी कोरोना संकटात काळजी घेऊन नागरीकांपर्यन्त पोहोचण्याचा प्रयत्न करावा. निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व सदस्यांचा मेळावा घेऊन शेला व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करु असेही ना. संजयभाऊ राठोड यांनी उपस्थित सर्व शिवसैनिक, पदाधिका-यांना संबोधित करतांना सांगीतले. पाच जिल्हयातील जवळपास चार हजार पेक्षाही जास्त ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी संजयभाऊ राठोड यांच्यावर पक्षाने सोपिवली आहे. त्याअनुषंगाने पाचही जिल्हयात ततालुकानिहाय मतदार संख्या, वार्डनिहाय माहिती, सदस्य संख्या यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यवतमाळ जिल्हयातील जवळपास पन्नास टक्के ग्रामपंचायती मध्ये महाविकास आघाडी सोबत राहून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या विषयावर सुध्दा बैठकीत चर्चा करण्यात आली. आढावा बैठकीचे प्रास्तविक शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केले. जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी सुध्दा जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. याप्रसंगी मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, जिल्हा परीषद अध्यक्षा सौ. कालींदाताई पवार, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, जिल्हा परीषदेचे आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, बाळासाहेब चौधरी,सौ निर्मलाताई विनकरे,सौ लताताई चंदेल,सौ सागरताई पुरी, शैलेश ठाकुर,जेष्ठ मार्गदर्शक परमानंद अग्रवाल,नामदेवराव खोब्रागडे उपस्थित होते. बैठकीला उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, गजानन बेजंकीवार,सलिम खेतानी, प्रविण शिंदे,हरीहर लिंगनवार,दिगंबर मस्के,संजय निखाडे,दीपक कोकास,ऍड बळीराम मुटकुळे,राजेश खामनेकर,चितांगराव कदम,उत्तम मामा ठवकर,मनोज नाल्हे,वसंत जाधव,दिपक, काळे,निलेश मैत्रे,विनोद काकडे,निलेश चव्हाण,रवी राठोड,राजूभाऊ बांडेवार, संजय आवारी, शरद ठाकरे,रवी बोडेकर, रविकांत रुडे,प्रमोद भरवाडे,रवींद्र भारती,राहुल सोनुने,संदीप ठाकरे डॉ अनिल नाईक मनोज भोयर मनोज ढगले,संजय कांबळे,राजेंद्र गिरी ,राजू दुधे तसेच सर्व तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख उपस्थित होते.
चौकट
भाजपासोबत कोणत्याही परिस्थितीत युती नाहीच
यवतमाळ जिल्हयात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूकीत सुध्दा महाविकास आघाडी कायम राहील. मात्र कुठल्याच परीस्थितीत भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही युती करणार नाही. या संदर्भात आम्हाला शिवसेना पक्षप्रमुखांकडून सुध्दा तसेच आदेश प्राप्त झाले आहे.
ना संजय राठोड
पालकमंत्री यवतमाळ जिल्हा