Saturday, June 15, 2024
Homeयवतमाळग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज

उमरखेड : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज झाली आहे. २९९ व राखीव ३० मतदान केन्द्रासह एकुण ३२९ मतदान केन्द्र स्थापन करण्यात आले आहे. या निवडणुकीकरीता एकुण १३१६ अधिकारी व कर्मचारी संख्याबळ वापरण्यात येणार आहे . यात निवडणूक अधिकारी म्हणून तहसिलदार आनंद देऊळगावकर यांच्या नियंत्रणाखाली एकुण २१ निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे सहाय्यक म्हणून २१ कर्मचारी व ३२९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .


१५ जानेवारी रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे तर ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहे . निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक तसेच गावपूढाऱ्यांची लगबग सुरू असून तहसिल परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे .उमरखेड , पोफाळी , बिटरगाव व दराटी अशा चार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एकुण ८५ ग्रामपंचायती पैकी पोलीस दफ्तरी नोंद असलेल्या एकुण २२ गावांमधील ३७ इमारती व१०४ बुथ संवेदनशिल म्हणून जाहीर करण्यात आले आहेत . उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चारही पोलीस स्टेशन अंतर्गत यंत्रणा सज्ज झाली आहे .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular