शेतकरी विधवांची संयुक्त किसान मोर्चाकडे एकमुखी मागणी
यवतमाळ : देशात मागील दशकात लाखो कोरडवाहू शेतक-यांच्या आत्महत्या गाजत आहे. त्यातील ९० टक्के शेतक-यांच्या आत्महत्या विदर्भ ,मराठवाडा,तेलंगाणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश मध्ये झाल्या आहे. त्यांच्या कृषीधोरणात्मक मागण्यासुद्धा संयुक्त किसान मोर्च्याने भारत सरकार समोर रेटाव्या अशी मागणी करणारा ठराव विदर्भ विधवा संघटनेने पारित केला आहे.
राष्ट्रीय शेतकरी दिवसा निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सुराणा •ावन पार पडलेल्या कार्यक्रमात हा ठराव घेण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.
या कार्यक्रमात विधवा संघटनचे अपर्णा मालीकर, कविता सिडाम, ज्योती जिड्डेवार, स्वरस्वती अंबरवार यांनी ठराव मांडला होता. यावेळी बॉलिवूड चित्रपट निर्मार्ते ग्रँड मराठा फाउंडेशनचे संचालक रोहित शेलटकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी ग्रँड मराठा फाउंडेशनच्या अध्यक्षा माधवी शेलटकर स्मिता तिवारी, राजेश तावडे, आदिवासी नेते अंकित नैताम उपस्थित होते. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या ३४ दिवसापासून भारत सरकारच्या कृषी सुधारणा करणा-यांवर तीन कायद्याच्या विरोधात आंदोलनात शेतकरी विधवा यांनी आपला पाठींबा दिला. भारत सरकारने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर २० जानेवारीला शेकडो विधवा दिल्लीकडे प्रस्थान करून विदर्भ, मराठवाडा, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशच्या शेतक-यांच्या मागण्या रेटणार असल्याची माहिती शेतकरी विधवा भारती पवार यांनी दिली .