महागाव : तालुक्यातील सवणा येथे कृषी महाविद्यालय उमरखेड व ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ७ व्या सत्रातील कृषी दुत आकाश हुम्बे, शरद जाधव,रितेश नरवाडे,ऋतिक चौधरी, महेश टेकाळे, रोहित देशमुख,शैलेश शुरोशे यांनी पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण कशे करावे याबाबत चे प्रात्यक्षिक पूर्ण केले.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत गावातील पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरींमध्ये दूषित पाणी जमा होत असते .त्यामुळे जेव्हा नळाच्या माध्यमातून या पाण्याचा घरोघरी पिण्यासाठी पुरवठा केला जातो .तेव्हा दूषित पाण्यामुळे साथीचे आनेक रोग पसरतात
नकळत दूषित पाणी प्यायले जाते .त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागते . पावसाळ्यातील साथीचे आजार जशे उल्टी, टायफाईड, गॅस्ट्रो, जनतुंची वाढ यासारखे आजार थांबविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे .त्याकरिता योग्य प्रमाणात ब्लिचिंग पावडर चा वापर उपयुक्त ठरतो. तेव्हा ब्लिचिंग पावडर चा वापर कसा करावा व जलशुध्दीकरणचे फायदे याबाबत कृषीदुतांनी सवना येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सदर कार्यानुभव कार्यक्रम सवना येथील विहिरीवर करण्यात आला.
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. चिंतले , प्रा. आनंद राऊत,प्रा. वाय. एम. वाकोडे व ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री रवी सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले.