झरी : आदिवासीना दिलेले न्याय,हक्क, अधिकार मिळवुन देण्यासाठी या विषयावर आदिवासी नेते आमदार,आजी-माजी मंत्री कुणीच बोलाला तयार नाही. बोगस आदिवासीचा विषय निर्भिळ, निडर आणि जोरकसपणे न्यायालईन मार्गाने स्वतःची सुरक्षेची पर्वा न करता आदिवासीच्या न्याय,हक्क, अधिकार पुढे रेटून धरण्यासाठी ‘आफ्रोड’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेची झरी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
यावेळी ‘ऑफोड’ संघटनेच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष दिलीप कुडमथे, सचिव विलास कनाके, कार्याध्यक्ष प्रकाश येरमे, सल्लागार एम.कोडापे उपस्थित होते. यावेळी ‘महिला सहकारी सोसायटी हॉल ‘झरी’ येथे आदिवासी अधिकारी,कर्मचारी,सुशिक्षित तरुणाची सर्वानुमते झरी जामणी तालुका सर्वानुमते कार्यकारणी गठित झाली आहे. वि.टी.मडावी, (आफ्रोड अध्यक्ष झरी जामणी), एन.डी.कनाके (उपाध्यक्ष), पी.एन.डोनेकर(सचिव), एस.एम. येडमे(कार्याध्यक्ष), ए.डी.कुडमथे (कोषाध्यक्ष), रेखा कोडापे (महिला प्रतिनिधी), अजय राजगडकर (संघटक),राजू सिडाम (प्रसिद्ध प्रमुख) यांची निवड करण्यात आली. या बैठकीला आदिवासी अधिकारी, कर्मचारी, तरुण उपस्थित होते.