महागांव : पहील्या टप्प्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणूकी करीता ईच्छुक उमेदवाराने राखीव जागेवर निवडणुक लढवण्याकरीता जात वैध्यता प्रमाणपत्र मिळण्याकरीता जात पडताळणी समीतीकडे समाजिक न्याय व विशेष सहाय्य कार्यालय,यवतमाळ येथे जात पडताळणी करीता प्रस्ताव सादर केले होते.
मात्र उमेदवारी अर्ज छानणी होताच निवडणूक कार्यक्रम कोराेणाच्या प्रकोपामुळे पुढील आदेशापर्यत स्थगीत करण्यात आला होता. आजमितीस तो निवडणूक कार्यक्रमच रद्द करण्यात आल्याने नवीन निवडणुक कार्यक्रम नऊ महीन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लागला तरी नऊ महीने उलटुनही जात पडताळणी समिती ने अद्यापही परीपुर्ण कागदाची पूर्तता,शपथपत्रे,पुराव्यासह प्रस्ताव सादर करणा-या उमेदवारास जात वैद्यता प्रमाणपत्र वितरीत केलेले नाही. त्यामुळे जातपडताळणी समितीची निष्क्रीयता दृष्टीपथास येते ते प्रमाणपत्र तात्काळ वितरीत करावे असी मागणी संदेश रणवीर यांनी जिल्हाधीकारी समाजकल्यान आयुक्त, व सामाजिक न्याय मंत्री यांना आपले सरकार पोर्टलवर पाठवुन लक्ष वेधले आहे.