Friday, December 1, 2023
No menu items!
Home यवतमाळ उमरखेड नगरपरिषदे अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा

उमरखेड नगरपरिषदे अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा

राहूल गांधी विचार मंचचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

यवतमाळ : उमरखेड नगरपरिषदच्या वतिने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली. या योजनेच्या लाभार्थांकडुन प्रति लाभार्थी कडुन २९ हजार रुपये उकळले असुन गैरव्यवहार झाला आहे.नगर परिषदेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या रकमेत अफरातफर करणाऱ्यावर ४२० कलमान्वये गुन्हे दाखल करा अशी मागणी राहुल गांधी विचार मंचच्या वतिने निवेदनतुन करण्यात आले.

उमरखेड येथील नगर परिषदेसमोर गेल्या सात दिवसांपासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आमरण उपोषण सुरू केले. पंतप्रधान आवास योजनेच्या रक्कमेत मोठ्याप्रमाणात अफरातफर झाल्याने राहुल गांधी विचार मंचच्या महिला प्रदेशाध्यक्षा प्रा.डॉ.मीनाक्षी सावळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनातून मागणी करण्यात आली की पंतप्रधान आवास योजनेत योजनेमध्ये घोटाळा करणाऱ्या संबंधितावर ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी राहुल गांधी विचार मंचच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या मिळणाऱ्या अनुदानातून नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी व बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संगमतावरून ९० लाभार्थ्यांच्या खात्यातून प्रति लाभार्थी २९ हजार रुपये कोणत्याही लाभार्थ्याचे परवानगी न घेता कोणत्याही विड्राल स्लीपवर सही न घेता परस्पर काढण्याचा धक्कादायक प्रकार उमरखेड नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला. या विरोधात उमरखेड नगरपरिषदे समोर उपोषण सुरू असुन काही व्यक्तींचे उपोषणाला बसलेल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले.त्यामुळे उपोषणकर्तांची मागणी पुर्ण करुन उपोषण सोडविण्यासाठी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या रकमेत अफरातफर करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी राहुल गांधी विचार मंचच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.निवेदन सादर करतांना राहुल गांधी विचार मंचच्या महिला प्रदेशाध्यक्षा प्रा.डाॅ.मीनाक्षी सावळकर,यवतमाळ नगरपरिषदेचे विरोधी गट नेता चंद्रशेखर चौधरी,राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष सुकांत वंजारी,अजय किन्हीकर,उमेश इंगळे,महिला जिल्हाध्यक्षा प्रियंका बिडकर,जिल्हा उपाध्यक्षा संजीवनी कासार,शहर काँग्रेसचे सरचिटणीस डाॅ.सचिन येरमे,राहुल गांधी विचार मंचचे कार्याध्यक्ष किशोर कुळसंगे,उमरखेड नगर सेविका कविता राहुल काळबांडे,नगरसेविका कल्पना शैलेश अनखुळे,नगर सेविका रुपाली गजानन रासकर,अशोक जाधव,आदी उपस्थित होते.

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

पांढरकवडा बस स्थानक येथे महिलांचे कायदे विषयक जनजागृती व माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण

पांढरकवडा दि.१८/१०/२०२१आज पांढरकवडा बस स्थानक येथे नगर परिषद पांढरकवडा, बस आगार व्यवस्थापक, तहसील कार्यालय पांढरकवडा, विधी सेवा समिती,तथा वकील संघ आणि सर्व...

कृषि विद्यार्थ्यांनी केले जलशुद्धीकरणाचे प्रात्यक्षिक !

महागाव : तालुक्यातील सवणा येथे कृषी महाविद्यालय उमरखेड व ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ७ व्या सत्रातील कृषी दुत आकाश हुम्बे, शरद...

Most Popular

चंद्रपूर ते पडोली,धानोरा,भोयगाव मार्गे गडचांदूर बस सुरू करा प्रहार ची मागणी

गडचांदूर:-गडचांदूर वरून चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी भोयगाव मार्ग,कमी खर्च व कमी वेळेचा मार्ग असल्याने नागरिक याच मार्गाला पसंती देतात.पुर्वी हा रस्ता अत्यंत...

लाइट्स मेटल्स उद्योगातर्फे परिसरातील गावातील गरजू विद्यार्थांना निशुल्क औद्योगिक प्रशिक्षण

घुग्घुस येथील लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फे परिसरातील म्हातारदेवी, शेनगाव, उसगांव व घुग्घुस या गावातील २१ आवश्यक...

29/11/2023

CLICK HERE

Recent Comments

Laura Heacock on 14/06/2021
Mike Canty on 27/06/2021
Malcolm Martin on 18/05/2021