प्रहार संघटनेची प्रादेशिक परिवहन अधिका-यांकडे तक्रार
विदर्भ कल्याण न्युज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र व आंध्र प्रदेशच्या सिमेवर असलेल्या पिंपळखुटी येथ आरटीओ चेक पोस्ट आहे. दोन्ही राज्यातून ये-जा करणा-या वाहनाची तपासणी करण्यात येत. चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या वाहन निरीक्षकांनी खाजगी इसमांना कामावर ठेवले आहे. सदर खाजगी इसम वाहनधारकांकडून वसुली करीत असल्याचा आरोप प्रहार वाहन चालक संघटनेने केला आहे. या बाबतची तक्रार अमरावती येथील प्रादेशीक परिवहन अधिकारी राम गिते यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य व आंध्र प्रदेश या दोन्ही राज्याच्या सिमेवर पिंपळखुटी येथे सिमा तपासणी नाका आहे. त्या ठिकाणी अकोला, अमरावती व यवतमाळ येथील उपप्रोदशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकांची ड्युटी लावण्यात येते. या निरीक्षकांनी काही खाजगी इसमाची नियुक्ती केली आहे. सदर इसमांकडून या महामार्गवरून येणारे- जाणारे वाहनाकडून अवैधपणे वसुली केल्या जात आहे. ही वसुली गेल्या कित्येक वषार्पासून सुरू असल्याची माहिती आहे. या बाबत शेतकरी मालवाहतुकदार यांनी प्रहार पक्षाकडे तक्रारी केल्या आहेत. हे लोक वेळप्रसंगी शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. या प्रकाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रहार वाहतुक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पिंटू उर्फ संतोष दांडगे यांनी निवेदनातून केली आहे. या तक्रारीच्या प्रती त्यांनी केंद्रीय परीवहन मंत्री नितीन गडकरी, राज्य परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री बच्चू कडू, परिवहन आयुक्त मुंबई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांनाही पाठविलया आहेत.

तर राज्यातील सर्वच चेक पोस्टवर आंदोलन करणार
पिंपळखुटी चेकपास्टवर वाहन निरीक्षकांनी खाजगी इसमांची नियुक्ती केली आहे. त्याच्याकडून वाहन चालकांकडून पठाणी वसुली करण्यात येते. आरटीओंच्या चेकपोस्टवर सुरू असलेल्या अनागोंदी कार•ााराची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार वाहन चालक संघटनेने अमरावती येथील प्रोदशिक परिवहन अधिका-यांना निवेदन दिले आहे. निवेदन देवून आठ दिवसाचा कालावधी झाला असून, अजुन पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. जो पर्यंत संबंधितांवर कारवाई होणार नाही तो पर्यंत आम्ही लढा देण्यात येणार आहे. प्रशासनाने कारवाई केली नाही तर राज्यातील सर्वच चेक पोस्टवर एकाच दिवशी तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार वाहन चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष दांडगे यांनी दिला.