विनोद तायडे
वाशिम– रिसोड शहरातील समाजसेवक सर्पमित्र अनंता देशमुख यांनी तिन दिवसा पासून सिव्हिल लाईन रोड साठी आमरण उपोषण चालु केले.आतापर्यत कोणत्याही अधिकारी दखल घेतली नाही.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.
सदर उपोषण तात्काळ सोडवा अन्यथा तिव्र आंदोलन करु असा इशारा शहर अध्यक्ष प्रदिप खंडारे यांनी दिला आहे.अनेक संघटनेचे पांठिबे उपोषणाला मिळत आहेत.तरी सुद्धा प्रशासना कडून कोणत्याही दखल घेतल्या जात नाही.बांधकाम विभाग तात्काळ मागण्या मान्य करुन रोडचे बांधकाम करावे.असा सुर जनतेकडून होत आहे.
सिव्हिल लाईन रोडचे बांधकाम तात्काळ करा अन्यथा रोडवर उतरून आंदोलन छेडु असे प्रदिप खंडारे यांनी बोलतानी सांगितले.यावेळी उपोषण करत्याना भेट देऊन पाहणी केली.यावेळी उपस्थित जि अध्यक्षा प्रमिला शेवाळे,प.स.सदस्य परसराम वानखेडे,रंगनाथ धांडे,डॉ प्रल्हाद कोकाटे,मुनवर खत्री,अब्दुल मुन्नाभाई,शहर अध्यक्ष प्रदिप खंडारे,विजय सिरसाठ,विश्वनाथ पारडे,अर्जुन डोंगरदिवे,मंगेश राजुरकर, सुरेश पट्टेबहादुर,सचिन टेकाळे,आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.