Tuesday, December 5, 2023
No menu items!
Home यवतमाळ अतिक्रमण करणाऱ्या महिलेने लावला पोटाला चाकू

अतिक्रमण करणाऱ्या महिलेने लावला पोटाला चाकू

कारवाईसाठी गेलेले महसुल व पोलिसांचे पथक माघारी

उमरखेड : येथील खंड १ हद्दीत ई क्लास जमिनीवर राहुटी ठोकून ४ एकर टेकडीच्या जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्या महिलांनी चक्क स्वतःच्या पोटाला चाकू लावला. अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महसूल व पोलिस पथकाला हतबल होवुन रिकाम्या हाताने परतावे लागले.

ही घटना काल दुपारी ३ वाजताचे दरम्यान स्थानिक महागाव रस्त्यावरील बायपास जवळील टेकडीजवळ घडली . मागील ४ दिवसांपासून महागांव रोडच्या अंदाजे चार एकर टेकडीच्या शासकीय जमिनीवर राहुट्या ठोकून चुरमुरा येथील सात आठ महिलांनी अतिक्रमण केले आहे. याबाबतची माहिती तलाठ्यांना मिळताच तलाठी ठाकरे व दत्तात्रय दुर्केवार हे महिला पोलीसांसह तगडया पोलीस बंदोबस्तात तेथे पोहचले. परंतू सक्षम पोलीस अधिकारी व महसुल अधिकारी मात्र तेथे कोणीही तेथे हजर नव्हते. पोलीस ताफा जवळ येताच महिलांनी आक्रमक भूमिका घेतली त्यातील एका महिलेने स्वत : च्या पोटाला चाकू लावला. त्यामुळे पोलीस व तलाठ्यांची भंबेरी उडाली. कार्यवाही न करताच पोलीस व तलाठी रिकाम्या हाताने परतले हा थरार पाहण्यासाठी शेकडो बघ्यांनी गर्दी केली होती.अतिक्रमण हे ४ एकरच्या एका बाजूला एक राहूटी तर दुसऱ्या टोकाला एक राहूटी असे करण्यात आले आहे. परंतू अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या पथकाला केवळ पथकात सक्षम अधिकारी कूणी नसल्यामुळे महिलांना घाबरुनच परत परतावे लागले . या घडलेल्या प्रकारामुळे मात्र शहरात विविध चर्चेला पेव फुटले आहे .

चौकट
अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणी महसुल , पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथक ( महिला ) असा संपूर्ण ताफा पोहचला असतांना मात्र घटनास्थळावर केवळ दोन पोलिस , आठ, दहा महिला राखीव पोलीस , दोन तलाठीच हजर असल्याने या कर्मचाऱ्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी आदेश देणारा अधिकारी हजर राहत नाही. त्यामुळे प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य कळाले की नाही हा प्रश्नच राहिला आहे .

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

पांढरकवडा बस स्थानक येथे महिलांचे कायदे विषयक जनजागृती व माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण

पांढरकवडा दि.१८/१०/२०२१आज पांढरकवडा बस स्थानक येथे नगर परिषद पांढरकवडा, बस आगार व्यवस्थापक, तहसील कार्यालय पांढरकवडा, विधी सेवा समिती,तथा वकील संघ आणि सर्व...

कृषि विद्यार्थ्यांनी केले जलशुद्धीकरणाचे प्रात्यक्षिक !

महागाव : तालुक्यातील सवणा येथे कृषी महाविद्यालय उमरखेड व ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ७ व्या सत्रातील कृषी दुत आकाश हुम्बे, शरद...

Most Popular

Recent Comments

Laura Heacock on 14/06/2021
Mike Canty on 27/06/2021
Malcolm Martin on 18/05/2021