महागाव-
कोविड 19 सध्या तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना आणि पूर्वतयारी केली जात आहे याच पार्श्वभूमीवर शिक्षणा फाउंडेशन आणि विभा इंडिया या सामाजिक संस्थांनी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी एक मोहीम राबवली होती या मोहिमेतून पीपीई कीट, हॅन्ड ग्लोज , सर्जिकल ग्लोज, N95 मास्क , सर्जिकल मास्क असे साहित्य उपलब्ध झाले. सोमवारी आरोग्य विभागाकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले .या प्रसंगी महागाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी मा. डॉ. जब्बार पठाण सर, कोविड सेन्टर चे व्यवस्थापक डॉ. अंजली मुडे मॅडम
तसेच शिक्षणा फाउंडेशन चे तालुका समन्वयक गणेश उपेवाड व वैशाली शिवरकर उपस्थित होते.
शिक्षणा फाउंडेशन कार्यरत असलेल्या आर्णी, दिग्रस तालुक्यात देखील मदत सुपूर्द करण्यात आली.
शिक्षना फाउंडेशन संस्थेच्या शैक्षणिक कामाबद्दल आणि सामाजिक बांधिलकी बद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण सर यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.