भंडारा :
भंडारा : परिवहन मंत्र्यांच्या इशारावजा आवाहनानंतरही कर्मचारी संपावर ठाम असून भंडारा विभागातील १९३ जणांनी नाेकरी टिकविली असून, इतरांंवर आता काय कारवाई हाेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान केवळ पाच बसेस सुरू आहेत. भंडारा विभागातील सहा आगारांत १४४३ कर्मचारी आहेत. त्यांपैकी १२५० कर्मचारी संपावर कायम आहेत. तूर्तास १९३ कर्मचारी आपले कर्तव्य बजावीत आहेत. भंडारा विभागातील ३६७ बसेसपैकी केवळ पाच बसेस सुरू असून ३६२ बसेस आगारात उभ्या आहेत. आतापर्यंत कर्मचाऱ्यांचे निलंबन, सेवासमाप्ती केल्यानंतरही कुणी कामावर यायला तयार नाही. परिणामी बससेवा ठप्प आह.
अखेरच्या दिवशी एक लिपिक कामावर परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर भंडारा आगारातील केवळ एक लिपिक कामावर रुजू झाला. इतर कर्मचारी मात्र न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करीत आहेत. सहाही आगार बंदच भंडारा विभागातील सहाही आगारे बंद असून, केवळ साकाेली आगारातून तीन व भंडारा आगारातून दाेन बसेस सुरू आहेत. त्यांना पाेलीस संरक्षण दिले जात आहे. पाच बसेस रस्त्यावर गत दाेन आठवड्यांपासून भंडारा विभागातील साकाेली आणि भंडारा आगारांच्या बसेस सुरू आहेत. भंडारा- नागूपर आणि भंडारा-साकाेली अशा बसफेऱ्या हाेत आहेत. प्रवाशांचा त्यांना चांगला प्रतिसाद लाभत आह
संपकरी कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु त्यांची कामावर येण्याची मानसिकता दिसत नाही. विभागीय वाहतूक अधिकारी