माजी पालकमंत्री आ.डॉ.परिणय फुके, शोभा यादवराव पडोळे ,डॉ.प्रशांत पडोळे, विवेक पडोळे, सुर्यकांत इलमे यांच्या हस्ते झाले बक्षीस वितरण
भंडारा:-
रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व भंडारा जिल्हा रग्बी असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने रेल्वे मैदान खात रोड भंडारा येथे स्व. यादवराव पडोळे स्मृती महाराष्ट्र राज्य ज्युनियर मुले मुलींची रग्बी अजिंक्यपद स्पर्धा दि.१३,१४ नोव्हेंबर ला थाटात संपन्न झाली या स्पर्धेत दोन्ही गटात कोल्हापूर संघाने विजेतेपद पटकावले उपविजेता मुलांच्या गटात ठाणे तर मुलींच्या गटात सातारा संघाने बाजी मारली,तसेच मुंबई शहर मुले यांनी तृतीय स्थान पटकावले तर मुंबई उपनगर मुली यांनी तृतीय स्थान पटकावले. स्पर्धेचे बक्षीस वितरण मा शोभाताई यादवराव पडोळे यांचे अध्यक्षतेखाली, मा परिणय फुके आमदार विधानपरिषद भंडारा-गोंदिया, यांचे उपस्थितीत तसेच समीर मेंडजोगे, मा शिल्पाताई आस्वले,मा डॉ प्रशांत पडोळे, मा सचिन झंवर,मा सूर्यकांत ईलमे, मा अजित आस्वले,मा विनोद बांते, मा विवेक पडोळे स्पर्धा आयोजन अध्यक्ष, मा ऋतुजा पडोळे, मा विकास चौरासिया,यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना मेडल्स, प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्व.यादवराव पडोळे स्मृती महाराष्ट्र राज्य ज्युनियर रग्बी अजिंक्य पद स्पर्धेत कोल्हापूर मुले मुली अजिंक्य राहिल्यात
या स्पर्धेत डॉ प्रकाश सिंग, मोहन दाढी,राजेश गेडाम,पंकज सार्वे,विजय तायडे,शिवा पडोळे, बेनीलाल चौधरी, दिनेश टेकाम, प्रशांत घाटबांधे,सुनील खिलोटे,शाम देशमुख, सतीश शेंद्रे, अनुराग गभने,भुपेश पारधी,क्रीष्णा उपरिकर, गोपाल ढोकरीमारे,उमेश मोहतुरे तसेच आयोजन अध्यक्ष विवेक पडोळे यांनी अथक परिश्रम केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विना सिंगनजुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण बांडेबूचे यांनी केले