खा. सुनिल मेंढे यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
भंडारा : स्वर्गीय शामराव बापूंच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. साकोली येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
स्व. शामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. शामराव बापूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
जनसंघ ते भाजपा आणि अन्य क्षेत्रातील शामराव बापूंची वाटचाल आणि अनेक आठवणींचे संकलन करून स्वर्गीय शामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानने तयार केले आहे. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आलेल्या विमोचनाच्या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, डॉ श्याम झिंगरे, गजानन डोंगरवार, साहित्यिक हरिश्चंद्र बोरकर, डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ.मनीष कापगते, अॅड बापूसाहेब अवचरे, तालुका अध्यक्ष लखन बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा कार्य करणाऱ्या सेवाव्रतीचा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान केला. यात शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांचाही समावेश होता. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांनी केले. वेगवेगळ्या व्यक्तींच्या शामराव बापूंच्या बद्दल असलेल्या आठवणी संकलित करून समग्र पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी खासदार मेंढे यांनी, शामराव त्यांच्या विविध आठवणींना उजाळा देत त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार मनीष कापगते यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.