गोंदिया :
भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आज गोंदिया येथे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वप्रथम दुर्दैवी अपघातात तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत व सैन्य दलातील अधिकारी शहिद झाले. या दुर्दैवी घटनेत शहिद झालेल्या अधिकार्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्पे श्रध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान दोन मिनिटांचे मौन पाळून शहिद अधिकार्याविरूध्द शोकसंवेदनाही व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेन्द्र जैन, आमदार राजू कारेमोरे, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी खासदार खुशाल बोपचे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, जयंत वैरागड़े, अनिल बावनकर, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, यशवंत सोनकुसरे, प्रभाकर दोनोडे, डॉ विकाश गभने, प्रभाकर सपाटे, योगेंद्र भगत, रविकांत बोपचे, रमेश ताराम, नरेंद्र झंझाड, केतन तुरकर, अविनाश काशीवार, चुन्नीभाऊ बेंद्रे, गणेश बरडे, रजनी गिरहेपुंजे, किशोर तरोने, बालकृष्ण पटले, लोकपाल गहाने, बालू चुन्ने,देवचंद ठाकरे, तुकाराम मेंढे, योगेश सिंघनजुडे, कमलबापू बहेकार, सी. के. बिसेन, गोपाल तिराले, गोपाल तिवारी, शैलेश मयूर, लोमेश वैध, सुनील टेभरें, अंगराज समरीत, एड. मोहन राऊत, सुरेश हर्षे, रफिक खान, सुरेश बघेले, अजय गौर, राजेश भक्तवर्ती, अखिलेश शेठ, राजेश तुरकर, सदाशिव ढेंगे, विजय पारधी, बिश्राम चर्जे, करण टेकाम, रमेश गौतम, सुनील पटले, इकबाल भाई, सुशील तिराले सहित ओबीसी सेल चे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते।