• मुख्यमार्ग लाखांदूर रोड टि पॉईंटवर शिवसेना नेत्यांच्या हस्ते थाटात झाले शुभारंभ •
साकोली : शहरात महाविकास आघाडीच्या अभिनव योजनेत मजूर, रिक्षाचालक व गोरगरीबांना सर्वात कमी शुल्कात जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी अंमलात आणली असून साकोली शहरात आता तब्बल ४ शिवभोजन केंद्र स्थापन झाले. ( ११ सप्टें.) लाखांदूर रोडवर टि पॉईंट पाणी टंकी समोर अन्नपूर्णा शिवभोजन केंद्राचे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्या हस्ते थाटात शुभारंभ संपन्न झाले.

हे नविन शिवभोजन केंद्र परीसरात लाखांदूर रोड येथे न्यायालय, डाकघर, उपविभागीय कृषि कार्यालय, तालुका कृषि कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, उपजिल्हा रूग्णालय, धान्याचे शासकीय गोदाम व विशेष म्हणजे येथे लाखांदूर, अर्जूनी/मोर, नवेगावबांध, वडसा, चंद्रपुर – गडचिरोलीकडे जाणा-या प्रवाशांचे मुख्य बस थांबा ठिकाण आहे हे विशेष. शिवभोजन केंद्र शुभारंभात अध्यक्ष नरेश डहारे सहसंपर्क प्रमुख भंडारा जि.शिवसेना, उदघाटक निलेश धुमाळ शिवसेना संपर्क प्रमुख भंडारा/गोंदिया, प्रमुख अतिथी संजय रेहपाडे शिवसेना जिल्हा प्रमुख, पंकज यादव शिवसेना जिल्हा प्रमुख गोंदिया, सुनिल लांजेवार, राजू पटले, लोकेश यादव, अँड रवि वाढई, प्रमोद मेश्राम महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष, अजय राठोड, श्रीकांत पंचबुद्धे, लवकुश निर्वाण, बाळा बोरकर, अनिल गायधने, शिवसेना साकोली तालुका प्रमुख किशोर चन्ने, उपतालुका प्रमुख विलास मेश्राम आदी हजर होते. कार्यक्रमात मंगेश गोडांगे, अरूण चन्ने, जगदीश मनगटे, विठोबा बोरकर, मंगेश वैद्य मवासे उपाध्यक्ष, हजारे गुरूजी, बळीराम बोरकर व शिवभोजन अन्न स्वयंपाक गृहाचे महिला पुष्पा राऊत, रंजना शहारे, भुमिता उजगावंकर यांचे अथक परीश्रम लाभत आहेत.