भंडारा :
बंद घर फोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना साकोलीजवळील सेंदूरवाफा येथील प्रगती कॉलोनीत मंगळवार 7 जून रोजी सकाळी उघडकीस आली. पांडूरंग महोदव राऊत असे चोरी झालेल्या शिक्षण सेवकाचे नाव आहे. यापुर्वीही प्रगती कॉलोनी परिसरात घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
पांडूरंग राऊत हे नवजीवन इंग्लिश पब्लीक स्कूल साकोली येथे कार्यरत होते. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांचे सोलापूर येथे जिल्हा परिषदेत शिक्षण सेवक म्हणून रुजू झाले. त्यांचे वडील महादेव राऊत हे सेनदूरवाफा येथील श्रीनगर कॉलोनीत राहतात. दरम्यान पांडूरंग राऊत हे आठवड्याभरापुर्वी सहकुटूंब मुंबईला गेले होते. यावेळी झाडांना पाणी टाकण्याकरिता शेजाऱ्यांकडे चावी दिली होती. त्यानुसार शेजारी हे सकाळच्या सुमारास पाणी टाकण्याकरिता गेले असता कुलूप तुटलेले आढळून आले. याची माहिती त्यांनी पांडूरंग राऊत व पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पांडूरंग राऊत हे परतीच्या प्रवासातच असल्याने ते सुध्दा पोहचले. यावेळी घरातील कपाटाची पहाणी केली असता दी ड तोळ्याचे मंगळसूत्र, दोन गोफ, आठ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, देवघरातील गणपती, लक्ष्मीच्या मुर्ती, चांदीचा करंडा व जवळपास Burglary again तीन हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदनों केला आहे.