तुमसर :
गेल्या अनेक वर्षांपासून तुमसरातील सर्प मित्रमंडळ सापांच्या जैव विविधतेच्या संवर्धनासाठी व त्यांच्या जीवदानासाठी निरंतर झटत आहेत सर्वप्रकारच्या सापांच्या संवर्धनासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची ही निष्काम सेवा निसर्गप्रेमासाठी अखंडपणे सुरू आहे. सध्या पावसाळ्यात विविध प्रजातींचे असंख्य साप मानवी वसाहतीत आढळून येतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने नाग, मण्यार, घोणस व फुर्से या केवळ चार प्रजातींचे सापच विषारी असतात.

तसेच काही प्रजाती या निमविषारी असून असंख्य प्रजाती या बिनविषारी असतात. परंतु सर्वसामान्य लोकांच्या मनात मुळात सापांविषयी असलेले अज्ञान, अंधश्रद्धा व सिनेमातून तयार होणार्या चुकीच्या धारणा यामुळे बहुसंख्य साप हे विनाकारण मारले जातात. परिणामी सापांच्या जैव-विविधतेस अपरिमित धोका निर्माण झाला आहे. तुमसर शहरातील सर्पमित्र मंडळ आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन व व्यावहारिक कौशल्याने सर्व प्रजातीतील सापांना मानवी अधिवासातून सुरक्षितपणे बाहेर काढत आहेत. तसेच त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा एकदा जीवदान देत आहेत. हे त्यांचे कार्य पर्यावरणाच्या दृष्टीने मोलाचे आहे।
आज दिनांक १४/११/२०२१ रोजी आग्री फॉरेस्ट या बिट मधे ९ सर्पानां सोडण्यात आले. (२ घोनास ),(२ नाग)(१ धुळनागिन ),( ४ पान दिवड ) अशे ९ सर्प फॉरेस्ट मध्ये सोडण्यात आले। या क्षणी दुर्गेश मालाधरे, आकाश पिकलमुंडे, यश चवळे, विलास मालाधरे, राम मेश्राम, स्वप्नील काळे हे उपस्थित होते।
शहरी व ग्रामीण भागात आढळणार्या सापांना नागरिकांनी न मारता त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन सर्पमित्र दुर्गेश मालाधरे यांनी केले आहे।