Tuesday, November 30, 2021
Homeभंडाराशेतजमिनी च्या वादातून सख्या भाऊ आणि वहिनीवर केला कुऱ्हाडीने वार

शेतजमिनी च्या वादातून सख्या भाऊ आणि वहिनीवर केला कुऱ्हाडीने वार

तुमसर :
शेतीच्या हिस्सेवाटणीवरून सुरू असलेल्या वादात लहान भावाने मोठ्या भावासह वहिणीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्याची घटना तुमसर तालुक्यातील खापा येथील आंबेडकर वाॅर्डात शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. डोक्यावर कुऱ्हाडीचे वार लागल्याने भावाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले आहे. अजाबराव नत्थू भोयर (३४) आणि निशा अजाबराव भोयर (३०) दोघे राहणार आंबेडकर वाॅर्ड खापा अशी जखमींची मीं नावे आहेत. तर खुशाबराव नत्थू भोयर (३०) रा.खापा असे आरोपी भावाचे नाव आहे.

खापा येथे भोयर परिवारातील तीन भाऊ एकाच घरात स्वतंत्र राहतात. तिघांचेही लग्न झाले आहे. अशातच अजाबराव आणि खुशाबराव यांच्यात गत काही दिवसांपासून शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेला होता. शनिवारी सायंकाळी अजाबराव घरी पूजा करीत असताना खुशाबरावने हातात कुऱ्हाड घेऊन भाऊ अजाबराववर हल्ला केला. हल्ला होत असताना अजाबरावची पत्नी निशा मध्ये आली. त्यावेळी तिच्यावरही कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले. अजाबरावच्या डोक्यावर तीन ते चार कुऱ्हाडीचे घाव लागल्याने तो घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला व निशाला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अजाबरावला नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आली. तर पत्नी निशावर तुमसर येथे उपचार सुरू आहेत.

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular