तुमसर : भंडारा-गोंदिया जिला शेतकरी बांधवांचा जिला आहे. येथील शेतकरी सुखी तर जिला सुखी. शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे सर्वात महत्वाचे असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुमसर तालुक्यात खासदार प्रफुल पटेल व पक्षाच्या इतर प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा व जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार पटेल म्हणाले की, केंद्रात मंत्री असताना या परीसरातील बावनथडी सिंचन प्रकल्पासाठी ५५० कोटीची निधी मंजुर केली होती. ज्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. परिसरात शेतकऱ्याना पाणी उपलब्ध झाले. बावनथडी सिंचन प्रकल्पासून उरलेले १० ते १२ गावात पाणी कसे पोहचवू शकतो या कामासाठी पाठपुरावा केला आहे. भाजपाच्या शासन काळात एकावेळी या परिसरातील माईल कंपनीला केंद्र शासन विकत होता. मी प्रयत्न केल्यामुळे तो निर्णय त्या वेळच्या भाजप शासनाने मागे घेतला. ज्यामुळे या परिसरात अनेकांना रोजगार उपलब्ध आहे. सध्याची भाजप सरकार देशात अनेक सार्वजनिक क्षेत्राच्या कंपनीची विक्री करत आहे. यामुळे रोजगाराचा संकट निर्माण होत आहे व जनतेमध्ये असंतोष पसरत असल्याचे प्रतिपादन खासदार पटेल यांनी केले.
कार्यक्रमाला पटेल यांच्या सोबत सर्वश्री आमदार राजु कोरेमोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, मधुकर सांबारे, देवचंद ठाकरे, अभिषेक कारेमोरे, यशवंत सोनकुसरे, विठ्ठल कहालकर, ग्यानीराम गौपाले, दिलीप सोनवाने, सुरेश रहांगडाले, डाॅ. सचिन बावनकर, संगीता मुंगुसमारे, ठाकचंद मुंगुसमारे, शिशुपाल गौपाले, कपिल जैन, गोल्डी पटले, राजु देषभ्रतार, इसराइल शेख, निशीकांत पेठे, अनिल टेकाम, माया गौपाले, धनेश बोरकर, गिरधारी देशमुख, शालीक गौपाले, डाॅ. दर्शन वासवानी, राजेंद्र बिसेन शरद खोब्रागडे, पंकज पंधरे, बलवींदर लोखंडे, नितीन शेंडे, श्याम गायधने, लालू मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.