*धाबेटेकडी येथील प्रकार *लाखनी वनपरीक्षेत्रातील अधिका-याकडे तक्रार
लाखनी :
सरकारी जागेवरील वृक्षाचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाची असून या करीता वन मजुरापासुन ते वन परिक्षेत्र अधिका-यापर्यंत यंत्रणा आहे, पण यांचेच आशीर्वादाने अवैध वृक्षतोड होत असल्याने वन क्षेत्राचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचा प्रत्येय वनरक्षक बिट रामपुरीचे अधिनस्त असलेल्या धाबेटेकडी येथे आला. परवानगी न घेता मालकीचे जागेसह अतिक्रमीत शासकीय जागेवरील वृक्षाचे कत्तल करण्यात आली आहे.
लाखनी वनपरीक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचारी तसेच लाकुड व्यवसायीकाचे संगनमताने परवानगी न घेता सरकारी जागेतील झाडे कापणे ही नित्याचीच बाब झाली आहे यात अर्थकारण दडले असल्याचे बोलले जाते. शिवनी येथील एका शेतक-यांचे वन परीक्षेत्र लाखनीचे अधिनस्त रामपुरी वनरक्षक बिटातील धाबेटेकडी येथे अंदाजे 0.60 आर. शेतजमीन असुन लगतचे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे. या शेतकऱ्याने एका लाकुड व्यवसायीकास सागवान, आंबा, मोहफुल, आजन, निंब आणि इतर आडजात प्रजातीचे 60 ते 70 वृक्ष 50,000/- रुपयात विकली होती. वन विभागाचे रितसर परवानगी घेऊन झाडे कापणे आवश्यक असताना वन कर्मचारी व कंत्राटदाराचे संगनमताने परवानगी न घेता 10 नोव्हेंबर 2021 रोजी वृक्ष कापण्यात आले. भरीसभर म्हणून या शेतकऱ्याचे शेताजवळ असलेल्या रमेश जानबा खेडकर यांचे काबिलकास्त गट क्रमांक 209/1 आराजी 0.80 आर मधील 14,000/- रूपये किमतीचे सागवान व निंब प्रजातीचे दोन वृक्ष कापल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वन परीक्षेत्र अधिकारी लाखनी यांचेकडे तक्रार केली आहे. वन अधिका-याकडुन संबधितावर काय कारवाई केली जाते याकडे धाबेटेकडी ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट (चौकट)
मौजा धाबेटेकडी येथे विनापरवानगीने मालकीच्या जागेतील तथा काही अतिक्रमित सरकारी जागेवरील 40 ते 50 वृक्ष कापण्यात आलेले आहेत याबद्दल वनपरीक्षेत्र अधिकारी लाखनी यांचेकडे तक्रार झाली आहे, नियमानुसार जप्तीची कारवाई केली जाईल.
**जी.जी. सोनटक्के, वनरक्षक बिट रामपुरी
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट (चौकट)
उत्तम काळे रा. शिवनी यांची मौजा धाबेटेकडी येथे शेतजमीन असुन लगतचे सरकारी जागेवर अतिक्रमण केले आहे, झाडे कापण्याच्या परवानगी बाबत माझेकडुन दस्तऐवज तयार केले नाही.
**योगराज डामरे, तलाठी सा.झा. क्र. 26 शिवनी