भंडारा :
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची) नविन टाकळी, स्टेशन रोड, भंडाराच्या वतीने सायकल रॅली काढून जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात आला.
सायकल रॅलीला शासकीय औ. प्र. संस्था मुलीची प्राचार्य जे.व्ही. निंबार्ते यांनी हिरवी झेंडा दाखविली. त्यावेळी गटनिदेशक व्ही. के. कावळे, शिल्पनिदेशक रोशनी मोहबे, शितल देव, जयश्री धोटे, योगेश सोनटक्के, भाग्यश्री सातपुते, एम. एम. इंगळे, पुजा लांजेवार, ए. जी. कळव, डी. वाय. सावरकर, आर. बी. कोडापे, माधुरी कुकलकर, जिल्हा सायकल क्लबचे सचिव विलास केजरकर, शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त
राहुल मेश्राम उपस्थित होते.
त्याप्रसंगी विद्यार्थीनींनी “सायकल चलावो पर्यावरण बचाव, सायकल चलावो आरोग्य बचाओ अशा प्रकारे घोषणा देत सायकल रॅली आय. टी. आय. ते शास्त्री चौक – गांधी चौक मार्गे शास्त्री चौक -आय. टी. आय पर्यंत काढण्यात आली. तसेच सायकल रॅलीचा आय. टी. आय येथे समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राची रहाटे, रक्षिता गेडाम, साक्षी राखडे, कोमल सार्वे, रुचिता घोरमोडे, भुमिका नंदवार, श्वेता सिंगनगुडे, अंकिता चकोले, साक्षी पेटकर, वैष्णवी ईखार, अंजली भाजीपाले, अपूर्वा गजभिये, दिव्या मते, स्नेहा मते, वैष्णवी कुंभलकर, अर्पिता भजनकर, तेजस्विनी गायधने, साक्षी वालदे व कर्मचारी तसेच शासकीय औ. प्र. संस्था मुली येथील सर्व विद्यार्थीनींनी सहकार्य केले.