गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना मार्गदर्शक सूचना
विदर्भ कल्याण
पवनी :
संपुर्ण राज्यभर गणेशोत्सवाची धामधूम असतांना कोरोना संसर्गाची आलेली तिसरी लाट रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशाची अंमलबजावणी तंतोतंत व्हावी म्हणून पवनी शहरातील नागरिकांना शांती व सुव्यवस्था राखण्याच्या मार्गदर्शक सुचना देण्या हेतू पोलिसांनी पथसंचलन केले.

सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून तिसरी लाट उग्र रूप धारण करण्याची भीती असतांना गणेशोत्सवाची परंपरा जोपासण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्बंधाचे पालन करून उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. शांती व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाने शासनाच्या नियमांच्या चाकोरीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली होती. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदी व जमावबंदी असल्याने शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन होण्यासाठी पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव साजरा करतांना मनोरंजनाचे कार्यक्रम टाळणे, आरती तसेच गणेश विसर्जन दरम्यान मिरवणूक व गर्दी नसावी. कोरोना नियमांचे पालन करतांना मास्क, सॅनिटाइझर, सामाजिक अंतर याकडे विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात यावे. कोरोनाचे संकट गेले नसून तिसऱ्या लाटेचे होणारे परिणामापासून बचावासाठी गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय असल्याने जनतेनी सावधान असण्याचा इशारा देखील पथसंचलनातून देण्यात आला. याप्रसंगी ठाणेदार जगदीश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक साखरकर, एपीआय चिलांगे, पीएसआय हरकंडे, पोह संतोष चव्हाण, खुपिया गजभिये, सत्यराव हेमने, भोयर, पठाण, चुटे, आरिकर, नागरिकर इत्यादी पपोलिस व होमगार्ड उपस्थित होते.
BOX
** पथसंचालनाने गावगुंडात धडकी!
कोरोना काळात पोलिसांकडून शहरात होत असलेले पथसंचलन जनतेसाठी आकर्षण आहे. दरम्यान शहरात चालणाऱ्या अनेक वाईट धंद्यांवर पोलिसांचा धाक निर्माण झाल्याने गैरकायद्याचे समर्थक गावगुंडांना धडकी भरली असल्याचे दिसते. पोलिसांनी घेतलेली शांती सुव्यवस्थेची जबाबदारी पथसंचलनाने चरम सीमेवर आल्यामुळे पोलिसांचे अभिनंदन होत आहे.