लाखनी :
उत्तर प्रदेशातील लखिमपूर(खिरी) येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहमंत्री सुपुत्राने चार चाकी वाहनाने चीरडल्याने ४ शेतकरी व १ पत्रकार शहीद झाले होते. या शहीद शेतकऱ्यांची अस्थीकलश यात्रा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे माध्यमातून राज्यभर भ्रमण चालू असताना १४ नोव्हेंबर रोज रविवार ला दिघोरी/मोठी टि-पॉइंट वर आगमन होऊन शिवाजी स्मारक बस स्थानक येथे किसान ब्रिगेड भंडारा चे संयोजक सिद्धार्थ लोणारे यांच्या नेतृत्वात पाहूण्यांचे स्वागत व अस्थी कलशाला अभिवादन करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अस्थीकलश यात्रेत राज्य सचिव अशोक सोनारकर , सदस्य अरुण बनकर , सदस्य शिवकुमार गणवीर , साकोलीचे दिलीप उंदिरवाडे , शैलेश गणवीर , जागेश्र्वर साखरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे , संयोजक सिद्धार्थ लोणारे , सामाजिक कार्यकर्ता मोनू अंबादे , एकनाथ देशमुख , मनोहर दुर्गे , पोलिस उपनिरीक्षक ग्यानिराम गोबाडे यांचेसह गावातील.प्रतिष्ठित नागरिक , शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते