भंडारा :

शहिद भगतसिंह यांची ११४ वी जयंती भंडारा जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड व विर भगतसिंह विद्यार्थी परिषदेतर्फे भंडारा, मोहाडी आणि तुमसर तालुक्यात बाईक रॅली काढून अभिवादन करण्यात आले. भंडारा येथे भगतसिंह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बाईक रॅलीला सुरुवात झाली. भंडारा वरून बाईक रॅली वरठी मार्गे मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला, हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून शहारातून तुमसर येथे भगतसिंह यांच्या विचारांचा गजर करत पोहचली. बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नविन बस स्टॅण्ड, राजीव गांधी पुतळा यामार्गे बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पोलिस स्टेशन तुमसर समोरील हुतात्मा स्मारक येथे भगतसिंह यांच्या प्रतिमेला पोलिस निरीक्षक चिंचोळकर साहेब, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल भुसारी, अभाअनिसचे तालुका राहूल डोंगरे, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक राजकुमार चामट, सचिव जयशंकर मने , विश्वास बडवाईक यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भगतसिंग यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन करण्यात आले. शहिद भगतसिंग यांच्या अभिवादन रॅली मध्ये संभाजी ब्रिगेडचे , जिल्हाध्यक्ष यशवंत भोयर,विभागीय अध्यक्ष विश्वास बडवाईक, विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्याम कोसरे, माजी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे,गणेश नंदनवार,पंकज पडोळे, प्रमोद केसलकर, दिनेश निबांते, प्रवक्ते राकेश शिंदेगणसुर, प्रकाश चव्हाण, विजय बालपांडे, दिनेश बालपांडे, निनाद ढोले, आकाश बिरमगडे, मिलिन्द मोटघरे , श्रीकांत उके, पराग किटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.