Saturday, July 27, 2024
Homeभंडाराशहर हित आणि विकास कामांचे हेतू ही माझ्या कारकिर्दीत पार पाडणाऱ्या कामांची...

शहर हित आणि विकास कामांचे हेतू ही माझ्या कारकिर्दीत पार पाडणाऱ्या कामांची पावती : प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष तुमसर

बाय लाईन : अमित रंगारी
तुमसर :-
शहरात अतिक्रमण आणि त्यातून जमिनीचे वाद अनेकांच्या समस्येचे मुख्य कारण आहेत. बाजार परिसर असो की वसाहतींचा भूखंड असो, अनेक ठिकाणी नगर परिषदेच्या अधिनीस्त जागेवर अतिक्रमण करण्यात आलेले आहेत. मात्र भविष्यात अश्या समस्या उद्भवू नये आणि शहराच्या प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये यातून तुमसर हद्दीतील जवळपास संपूर्ण पडीत व मोकळ्या जागेचे नियोजन नगर परिषदेने केले आहे. ते नियोजन पार पाडणारे प्रदीप पडोळे हे एकमेव महत्वकाक्षी नगराध्यक्ष ठरले आहेत. मोकळ्या जागेकरीता विशेष नियोजन अखून त्याकरीता सुरक्षा भिंतीची कामे करण्यात आलेली आहेत. त्यात जवळपास १.५ कोटी रुपये खर्चही करण्यात आलेले आहेत. तर अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर बालोद्यान उभारून चिमुकल्यांचेही भावना पडोळे यांनी यातून जोपासल्याची चर्चा शहरात केली जात आहे.


तुमसर शहर हे २३ वार्डच्या ११ प्रभागात विभागलेले जलद गतीने विकसित होणारे शहर ठरले आहे. विकसनशीलतेच्या उंबरठ्यावरील तुमसर हे भंडारा जिल्ह्यातील एकमेव शहर आहे. त्यानुरूप शहराचा आराखडा व विकास कामे आखण्यात प्रदीप पडोळे सध्या दर्जेदार नगराध्यक्ष ठरले आहेत. स्वतः अभियंता असलेले पडोळे यांच्या महत्त्वाकांक्षी वृत्तीने शहरात अनेक विकास कामे पार पडली आहेत. त्यात सध्या चर्चेत असलेल्या कामांमध्ये मोकळ्या जागेवरील सुरक्षा भिंती आणि त्यातून साकारण्यात आलेले बालोद्यानाचा समावेश आहे. शहरातील पतंजली मार्गावरील मोकळी जागा, बावनथळी वसाहत दरम्यान रजनीकांत पडोळे यांच्या घरा नजिक, नरेन ठाकूर यांच्या घरासमोरील जागा, कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील भव्य पटांगण, गजानन गृह निर्माण सोसायटी समोरील जागा, राजाराम लॉन नाजिकची जागा, त्यात अती विवादित असलेली संताजी धर्म शाळे मागील पटांगण, स्वामी समर्थ मंदीर नजिकची जागा या सर्व ठिकाणच्या जागेवर पडोळे यांच्या पाठपुरव्यामुळे सुरक्षा भिंती तयार करण्यात आलेल्या आहेत.
शहरातील विविध प्रभागात मोडणाऱ्या त्या मोकळ्या जागेवर तयार करण्यात आलेले सुरक्षा आवार येत्या काळात मोलाचे ठरणार आहेत. त्यात काही ठिकाणी बालोद्यान तर इतर ठिकाणी फुलांची बाग व बाजार समिती समोरील जागेवर प्रशिक्षणार्थी युवकांकरीता ओपन जिम तयार करण्यात आलेले आहेत. त्यात पुन्हा नवीन नियोजनातून साहित्य पुरवठा होणार असल्याची माहिती पडोळे यांनी दिली आहे. शहरातील नगर परिषदेच्या अधिपत्याखालील जागा विवादांचे कारण ठरते. त्यांचे वेळीच केलेले हे नियोजन येत्या काळात नगर विकास सर्वेक्षनातून मोलाचे ठरणार आहे. शहर हिताचे हेतू जोपासून कामे करत असल्याची भूमिका यातून पडोळे यांनी मांडली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular