भंडारा :
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी इतर महानगरांप्रमाणे भंडा रा शहरात सिग्नल व्यवस्था उभारली आहे. मात्र, हे सिग्नल केवळ नावालाच दिसून येत असून वाहतूक पोलिसांवरील ताण दिवसें दिवस वाढतच आहे.
भंडारा शहरातील नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक, त्रिमुर्ती चौक, शास्त्री चौक, गांधी चौकात मागील वर्षी सिग्नल यंत्रणा उभारली आहे. परंतु हे सिग्नल अजूनही सुरू झालेले नाहीत. लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्नल व्यवस्था पुन्हा कधी सुरू होणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे. सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलिस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. दिवसेंदिसें वस वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरी ल हा ताण कमी होऊ शकतो. वाहतूक पोलिस आपली महत्त्वाची भूमिका बजावितात. पण सिग्नल व्यवस्था केवळ शोभेपुरतीच उरली असून अजूनतरी धूळखात पडली आहे.
शहराचा वाढता विस्तार पाहता भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे येथे कार्यरत वाहतूक पो लिसांनाही अनेकदा चांगलीच कसरत करावी लागते. शिवाय एखाद्या वाहनधारकावर कारवाई करत असताना दुसरे वाहनधारक अतिवेगाने धूम ठोकून निघून जाते. यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक, त्रिमुर्ती चौक येथील सिग्नल यंत्रणा लवकर सुरू करण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू असलेला त्रिमुर्ती चौक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यातच भंडारा पंचा यत समितीसमोरील अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग व त्रिमुर्ती चौकातील रस्त्यालगत फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण पाहता येथे भंडारा नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. शिवाय या महत्त्वाच्या चौकातील सिग्नल बंद दिसत आहे. भंडारा शहरातील आरटीओ कार्यालयासमोरच वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. येथे अनेकदा महामार्गावरील अतिवेगाने येणारी वाहनांंमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. हीच अवस्था भंडारा तहसील पंचायत समिती कार्यालयासमोर दिसून येत आहे. थेट रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात.
भंडारा शहरातील सिग्नल सुरू नसले तरी शहरातील विविध चौकात वाहतूक पोलिस कार्यरत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाèयावर थेट कारवाई केली जाते. अतीवेगाने पोलिसांची नजर चुकवून गेले तरी पोलिस गाडीचा फोटो काढून कारवाई करतात. शहरातील सिग्नल सुरू झाल्यास वाहतुकीची समस्या सुटू शकेल. यामुळे वाहतूक पोलिसांनाही दिलासा मिळेल.