भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सरिता मदनकर यांनी त्यांचा वाढदिवस भारतीय औषधी अनुसंधान संस्था, वृध्दाश्रम भंडारा येथे साजरा करून सामाजिक दायित्व निभावले. संस्थेत असलेल्या वृद्धांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्यांना मिष्ठान्न भोजन दिले.

वृध्दाश्रम येथील गिता मेश्राम सुप्रिटेंन्डेंट व तिच्या सहकार्यांनी सहकार्य केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला मंजुषा बुरडे, धनवंता बोरकर, लता मासुळकर, वर्षा आंबाडारे, कल्याणी बोरकर, नंदा चेटुले, प्रिती रामटेके, मेश्राम, दुर्गा गभने आदी उपस्थित होते.