पवनी : स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती सोहळा निमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान महाविद्यालय पवनी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लेपसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

यावेळी ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोबतच आरोग्य तपासणी शिबिरात ५३ रुग्णांनी तर नेत्रनिदान शिबिरात २८ रूग्णांनी लाभ घेतला. कार्यक्रमाला हेमंत काळमेघ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डाॅ. विठ्ठल पतंगे व सहकार्यक्रम अधिकारी डाॅ. रिनी जैन तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व रा.से.यो चे सर्व स्वयंसेवकांन समवेत विविध सामाजिक संघटनांनी व समाजसेवकांनी सहकार्य केले.