Tuesday, July 16, 2024
Homeभंडारालाखनी शवविच्छेदन गृहात मुलभुत सोयींचा अभाव

लाखनी शवविच्छेदन गृहात मुलभुत सोयींचा अभाव

विज आणि पाणी नाही *नातेवाईकांची होते फरपट
लाखनी :
शवविच्छेदनाचे नाव घेताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. परंतु अपघात, खून, आकस्मित मृत्यू आत्महत्या व संशयास्पद मृत्यू अशा घटनांमध्ये शवविच्छेदनाची प्रक्रिया अपरिहार्य असते. तसेच न्यायिक बाब म्हणून ही प्रक्रिया महत्त्वाची असते. प्रत्यक्षात या ठिकाणी होणारे काम हे अत्यंत जबाबदारीचे व जोखमीचे काम आहे त्यामुळे येथे आवश्यक सुविधा उपलब्ध असणे क्रमप्राप्त आहे. परंतु लाखनी येथील शवविच्छेदन गृहात विजेची व पाण्याची सोय नसल्यामुळे कधी दिवसाच्या प्रकाशात तर कधी टॉर्चच्या उजेडात बाहेरून नेलेल्या दोन बाटली पाण्यात सर्व सोपस्कार पूर्ण करावे लागतात त्यामुळे मृत्यूनंतरही यातनांचा प्रवास संपत नसल्याची प्रचीती येत आहे.


लाखनी हे सवेदनशील गाव म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. तालुक्यात २ पोलिस स्टेशन व २ ग्रामीण रुग्णालय आहेत पालांदूर येथे ग्रामीण रुग्णालय आहे पण तिथे शव विच्छेदन गृह नसल्यामुळे पालांदूर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या घटनाचे शव विच्छेदन लाखनी येथे केले जाते. पालांदूर पोलिस स्टेशन हद्दीत लाखांदूर तालुक्यातील काही गावाचा समावेश होतो. तर लाखणी पोलिस स्टेशन मध्ये भंडारा व साकोली तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. अश्या मोठ्या परिसरात आही दर्घटना घडल्यास त्याचे शवविच्छेदन लाखनी मध्ये होत असते.
उत्तरिय परीक्षणासाठी गरज असणारे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी शवविच्छेदन गृहात आणले जातात त्यामुळे याठिकाणी वीज हवा व जास्तीत जास्त प्रमाणात पाण्याची गरज भासते परंतु लाखनी च्या शवविच्छेदन गृहात पाण्याची व विजेची सोय नाही. लाखनी ग्रामीण रुग्णालयाची इमारत मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे तर शवविच्छेदन गृह हे लाखणी नगरपंचायतीच्या हद्दीत आहे. याआधी नगरपंचायत प्रशासनातर्फे रुग्णालयाला शवविच्छेदन गृह बंद करण्यात यावे यासाठी पत्र देण्यात आले होते.
लाखनी येथे सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र होते त्या आरोग्य केंद्राचे शवविच्छेदन गृह म्हणून जुनेच बांधकाम असलेले इमारत नगरपंचायत हद्दीतील लाखोरी रोडवर आहे त्याच इमारतीत आजही शवविच्छेदन केले जाते. ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बनली त्यावेळी नवीन इमारतीत शवविच्छेदन गृह बनविण्यात आले मात्र ते इतके लहान आहे की त्यात शवविच्छेदन करणे शक्य नाही तसेच त्याबाबतीत मुरमाडी च्या ग्रामस्थांनी लोकवस्तीत शवविच्छेदन न करता गावाबाहेर करण्यात यावे अशी मागणी रुग्णालय प्रशासनास केली परंतु शवविच्छेदन गृह आणि उत्तरीय तपासणी इतरत्र ही बाब अशक्य आहे. शवविच्छेदन गृहाची निर्मिती प्राथमिक आरोग्य केंद्र असताना झाली होती त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली नवीन इमारतीत शवविच्छेदन रोड तयार करण्यात आले मात्र शवविच्छेदन गृह वापरणे योग्य नसल्यामुळे जुन्याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदन गृहात लाखणी व पालांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी सफाई कामगार नाही त्यामुळे भंडारा येथून सफाई कामगार बोलवावे लागते.
आकस्मित मृत्यू झाल्यास पोलीस पंचनामा दरम्यान बराच वेळ खर्च होतो त्यानंतर शवविच्छेदन गृहा पर्यंत आणण्यासाठी विलंब होतो ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर सफाई कामगाराला भंडार्‍यातून वा साकोली येथून बोलवावे लागते त्यामुळे मृतदेहाला इकडून तिकडून हलविताना कुटुंबीयांना फरफट सहन करावी लागते त्यामुळे मृतदेहाला मृत्यूनंतरही अवहेलना सहन करावी लागत आहे.
पाण्याची बोंब
शवविच्छेदन गावात पाण्याची सोय नाही पूर्वी शवविच्छेदन गृहाच्या समोरच हातपंप होते ते हातपंप काढून नगरपंचायतीने पाण्याची पाईपलाईन टाकली त्यातून त्या ठिकाणी एक नळ लावून देण्याचे सौजन्य नगरपंचायतीने दाखवले नाही त्यामुळे उत्तरिय परीक्षणासाठी बाहेरून दोन-तीन बाटली पाणी घेऊन कसंतरी सोपस्कर केल जातो त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
२ महिन्यांपासून वीज नाही
शवविच्छेदन गृह हे अत्यंत महत्वाचे घटक म्हणून ओळखले जाते. विजेचे देयक नियमित भरून सुद्धा वितरण कंपनीने वीज कापली आहे. मागे ३-४ महिन्याआधी अनुदान नसल्यामुळे वीजदेयक भरण्यास विलंब झाला तेव्हापासून आजपर्यंत नियमित विद्युत देयक भरून सुद्धा वीज जोडून दिली नाही. त्यामुळे वितरण कंपनीला कुठची विद्युत कापावी व कुठची कापू नये याचे भान असणे आवश्यक आहे. वीजेअभावी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. रात्री अपघात झाल्यास अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इसमास रात्रीच शवविच्छेदन गृहात टाकले जाते. पोलिसांसाठी न्यायिक बाब म्हणून शवविच्छेदन अहवाल महत्वाचा असतो. मात्र तिथेच पायाभूत सोई सुविधांचा अभाव असल्यामुळे त्याचा फटका इतरांना सहन करावा लागतो. शवविच्छेदनगृहाचा आरोग्य आणि पोलिस विभाग यांचा जास्तीच जास्त सबंध येत असला तरी सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
प्रतिक्रिया, स्टेटमेंट(चौकट)
लाखनी येथे उपलब्ध असलेले शवविच्छेदन गृह फार जुने आहे. तिथे पाण्याची सोय नसल्यामुळे शवविच्छेदन करतेवेळी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
डॉ. विवेक बोदलकर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, लाखनी

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular