भंडारा : जय जवान जय किसान संघटना भंडाराच्या वतीने संस्थापक प्रशांत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालय भंडारा येथे फळ, बिस्कीट व मास्क अनेक रुग्णांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जय जवान जय किसान संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष सचिन घनमारे, जिल्हा अपंग प्रमुख रंजन तिरपुडे, जिल्हा कलाक्षेत्र प्रमुख शिवदास वहाणे, जिल्हा मीडिया प्रमुख धीरज देशमुख, पवनी तालुका अध्यक्ष ऋषीकुमार सुपारे, महिला समन्वयक भारती लिमजे, आमगाव जिल्हा प्रमुख जगदीश कडव, वाहनचालक मालक तालुकाध्यक्ष निश्चल येनोरकर, सुनील मोगरे, नंदू नागोसे, सचिन हुमणे, जय बोरकर, सिद्धार्थ हुमणे, पराग खोब्रागडे, आयुष खोब्रागडे आदी उपस्थित होते.