तुमसर : तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने विविध ठिकाणी पक्ष बैठक व नागरिकांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी खासदार पटेल यांनी सर्व कार्यकर्त्यांनी समोरच्या जिला परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आले पाहिजे याकरिता योग्य रितीने नियोजन करुन काम करावे. आम्ही शेतकरी बांधव व सामान्य माणसाच्या हितासाठी नेहमीच कामे केली आहे. जनतेपर्यंत आपण केलेल्या कामांची माहिती द्या, असे पटेल यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, विठ्ठल कहालकर, देवचंद ठाकरे, राजु माटे, अभिषेक कारेमोरे, यशवंत सोनकुसरे, वासुदेव बांते, गितात माटे, रिता हलमारे, पमा ठाकुर, रामदास बडवाईक, निषीकांत पेठे, धनपाल चौधरी आदी उपस्थित होते.