लाखनी : पालांदूर येथे रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या रात्रकालीन सामन्यात नागपूर, गोंदिया, भंडारा ,गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींनी हजेरी लावलेली आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी बांधकाम सभापती विनायक बुरडे, माजी जि.प. सदस्य भरत खंडाईत, सरपंच पंकज रामटेके पालांदूर, उपसरपंच स्वप्नील खंडाईत, सुधन्वा चेटुले, डॉ अभय हजारे, डॉ प्रशांत फुलझेले, डॉ सारंग निर्वाण, देवेश नवखरे, भुदेव किंद्रले, सुखदेव गोंधोळे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
संचालन नितीन धकाते, प्रास्ताविक उमेर लद्यानी यांनी केले. तर आभार श्याम चौधरी यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंकज रामटेके, स्वप्निल खंडाईत, अली मोहम्मद लद्यानी, श्याम बेंदवार, देवेश नवखरे, डॉ अभय हजारे, डॉ अभियंता उमंग गायधनी, शुभम प्रधान, दिनेश तिजारे, आशिष सेलोटे, नितीन धकाते, श्याम चौधरी, विक्की यावलकर, देवानंद लांजेवार, प्रतिक धकाते, सागर वंजारी, आसिफ खान पठाण, नीरज किन्द्रले, अभिषेक कापसे, अंकित खंडाईत, निखिल खंडाईत, अविनाश बावणे, सागर बोरकर, अंकित राऊत, अमोल पडोळे, नितेश चांदेवार आदी सहकार्य करीत आहेत.