Saturday, July 27, 2024
Homeभंडारायुक्रेनमध्ये अडकलेले गोंदियाकर सुरक्षीत

युक्रेनमध्ये अडकलेले गोंदियाकर सुरक्षीत

गोंदिया :
युक्रेन-रशिया युद्धामुळे जिल्ह्यातील दोन विद्यार्थी व दोन का मगार युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांना सुरक्षीतरित्या युक्रेनबाहेर रोमानिया येथे काढण्यात आले असून एक विद्यार्थी आज, 2 मार्च रोजी दिल्लीत सुरक्षीतरित्या पोहचला.

युक्रेन व रशिया युद्धामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने युद्धस्तरावर पावले उचलली आहेत. गोंदिगों या जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खुशाल पटले हा विद्यार्थी व पवन मेश्राम हा कामगार तसेच गोरेगाव तालुक्यातील उमेंद्र भोयर हा विद्यार्थी व मयूर नागोसे हा कामगार युक्रेनमध्ये अडकले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे चारही जणांना युक्रेनबाहेर रोमानिया येथे काढले असून ते सुरक्षीत रोमानियाच्या शेल्टर होममध्ये आहेत. यापैकी तिरोडाच्या खुशाल पटले याला आज, 2 मार्च रोजी दिल्ली येथे आणण्यात आले आहे. तर उर्वरित तिघांनाही लवकरच देशात आणले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular