तुमसर : एस एन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यात महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी अशा ३२ जणांनी रक्तदान केले. यावेळी प्राचार्य डॉ चेतनकुमार मसराम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. लक्ष्मण पेटकुले, राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्यक्रमाधिकारी लेफ्टनंट अरुण चव्हाण, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ संजय आगासे, डॉ संतोष चौधरी, डॉ सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्णालयाचे डॉ रश्मी मलेवार, पूजा गुप्ता, संतोष जाधव, डॉ कविता लेंढे, प्रा अमोल खांदवे, प्रा रेनुकादास उबाळे, डॉ राजेश दिपटे, प्रा सुनील कान्होलकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.